|
नोंदणी क्र: MSCS/CR/1014/2014
ग.वै.ल. लोगो

गजवैभवलक्ष्मी मल्टी स्टेट ॲग्रो पर्पज को-ऑप. सोसायटी लि., पुणे

सहकारातून समृद्धी, शेतकऱ्यांसाठी प्रगती

सुविधा (Services)

गजवैभवलक्ष्मी अॅग्रो मॉल

सभासद शेतकरी बांधवांच्या शेती विषयक गरजा आणि आधुनिक कृषी व्यवस्थापनाचा विचार करून सन २०१४ साली संस्थेमार्फत पारगाव फाटा (लोणी व्यंकनाथ) येथे “गजवैभवलक्ष्मी अॅग्रो मॉल” या नावाने शेती उपयोगी साहित्य उपलब्ध करून देणारे केंद्र सुरू करण्यात आले.

या अॅग्रो मॉलमध्ये शेतीसाठी आवश्यक असणारे विविध प्रकारचे साहित्य, रासायनिक खते, कीटकनाशके, औषधे, दर्जेदार बी-बियाणे तसेच आधुनिक कृषी साधने एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येतात. शेतकरी बांधवांना प्रमाणित आणि उच्च गुणवत्तेचे साहित्य सहज उपलब्ध व्हावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

ज्ञान, गुणवत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञान यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना सक्षम करण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. सहकाराच्या बळावर कृषी क्षेत्रात प्रगतीची नवी दिशा देणे हेच आमचे ध्येय आहे.

Agro Mall
पारगाव फाटा (लोणी व्यंकनाथ)
शेती साहित्य आणि उत्पादने
  • विविध पिकांचे दर्जेदार आणि प्रमाणित बी-बियाणे
  • नामांकित कंपन्यांची रासायनिक व सेंद्रिय खते
  • प्रभावशील कीटकनाशके व बुरशीनाशके
  • आधुनिक कृषी साधने आणि उपकरणे
तांत्रिक मार्गदर्शन

योग्य पिकांची निवड, पेरणीचे नियोजन, आधुनिक शेती पद्धती तसेच उत्पादन व्यवस्थापन यासाठी वेळोवेळी शेतकरी मेळावे आणि मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात येते.

  • पेरणी ते काढणीपर्यंत संपूर्ण मदत
  • माती व पाणी तपासणी सल्ला
  • रोग-कीड नियंत्रण मार्गदर्शन