|
नोंदणी क्र: MSCS/CR/1014/2014
ग.वै.ल. लोगो

गजवैभवलक्ष्मी मल्टी स्टेट ॲग्रो पर्पज को-ऑप. सोसायटी लि., पुणे

सहकारातून समृद्धी, शेतकऱ्यांसाठी प्रगती

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

संस्थेच्या कार्यपद्धती आणि योजनांबद्दल सभासदांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे.

कोणत्याही पात्र व्यक्तीला संस्थेचा सभासद होता येते. त्यासाठी 'सभासद नोंदणी फॉर्म' भरून देणे आवश्यक आहे. यासोबत आधार कार्ड, पॅन कार्ड, २ पासपोर्ट साईझ फोटो आणि रहिवासी पुरावा जोडावा लागतो. तसेच संस्थेचा निर्धारित प्रवेश शुल्क आणि किमान भागभांडवल भरणे आवश्यक आहे.

गजवैभवलक्ष्मी अॅग्रो मॉलमध्ये प्रामुख्याने प्रमाणित आणि उच्च गुणवत्तेचे बी-बियाणे, नामांकित कंपन्यांची खते आणि कीटकनाशके सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत. याशिवाय माती परीक्षण आणि कृषी तज्ञांचे तांत्रिक मार्गदर्शन मोफत पुरवले जाते.

संस्थेमार्फत शेतकऱ्यांना अतिशय सुलभ आणि शासन मान्य दरामध्ये पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाते. कर्जाची मर्यादा आणि व्याजदर हे दरवर्षी संचालक मंडळाच्या बैठकीनुसार ठरवले जातात. चालू दरांची माहिती घेण्यासाठी कृपया संस्थेच्या मुख्य कार्यालयाशी संपर्क साधावा.

होय, गजवैभवलक्ष्मी मल्टी स्टेट ही भारत सरकारच्या सहकार मंत्रालयांतर्गत (नोदंणी क्र. MSCS/CR/1014/2014) नोंदणीकृत व कायदेशीर संस्था आहे. संस्थेचा कारभार पूर्णपणे पारदर्शक आणि शासन नियमानुसार चालतो, त्यामुळे ठेवीदारांची सुरक्षितता याला सर्वोच्च प्राधान्य आहे.
अजूनही शंका आहेत?

आमच्या प्रतिनिधींशी थेट संपर्क साधा. आम्ही आपल्या शंकांचे निरसन करण्यास तत्पर आहोत.

संपर्क करा